जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कारागृह रक्षकाला पिस्तूल लावून पळून गेलेल्या तीन पैकी एक कैदी गुन्हे शाखेने नंदुरबारच्या नवापुर येथून काल ताब्यात घेतले. त्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने त्याला २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोघा फारार संशयितांना पळवून नेणाऱ्या जगदीशने ज्या दुचाकीने तिघांना पळवून नेले होते ती, पोलिसांनी जप्त केली आहे. कारागृह रक्षक पंडित दामू गुंडाळेला पिस्तूल लावून मारहाण करत सागर संजय पाटील (वय- २३, रा. अमळनेर), गौरव विजय पाटिल(वय-२१, रा.अमळनेर), बडतर्फ पोलीस सुशील अशोक मगरे(वय-३२) अशा तिघांनी कारागृहातून (ता.२५ जुलै 2020) पळ काढला. ठरल्या प्रमाणे त्यांचा साथीदार जगदीश पुंडलीक पाटील(वय-१९) याने आणलेल्या दुचाकीवर चौघे नंदुरबारच्या दिशेने पसार झाले होते.
महिना भर पोलीस यंत्रणा या चौघांच्या पाठलाग करत असतांना २४ ऑगस्ट रेाजी जगदीश पाटील याला गुन्हे शाखेने साक्री येथून अटक केली हेाती. तदनंतर त्याचा साथीदार आणि जेल तोडून पळणाऱ्या तिघांमधील संशयित सागर पाटील याला गुन्हेशाखेने नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर येथून अटक केली. आज त्याला जिल्हा न्यायालयात न्या. एस.एन.फड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने संशयिताला २ सप्टेंबरपर्यंत पेालीस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे ॲड. बी.यु.पाटील यांनी कामकाज पाहिले.