जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हलक्या वाहनांसाठी पूल खुला करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुभाष राऊत, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाच्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या २२ स्लॅब पैकी २० स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित २ स्लॅब टाकण्याचे काम १२ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हे स्लॅब टाकल्यानंतर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा पूल हलक्या वाहतुकीसाठी म्हणजेच मोटरसायकल व लहान वाहनांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी पूल सुरु करण्यात यावा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी संबधितांना यावेळी दिल्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/839125673711732