Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन

0
22

 

जळगाव, प्रतिनिधी  । जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य इमारतीच्या आवारात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, लेखाधिकारी दिलीप वानखेडे आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound