जळगाव, प्रतिनिधी । सुरक्षा रक्षक मंडळ हे सुरक्षा रक्षकांचे हित डावलून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशन सुरक्षा रक्षक कामगार समितीतर्फे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात येत आहे.
महापेरेषण कंपनी जळगाव विभाग येथे पूर्वी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची मंडळात नोंदणी होण्या करिता व मंडळात मुख्य मालक म्हणून नोंदीत असलेल्या आस्थापनेत संबधित सुरक्षा रक्षकांची नेमणूक होण्या करिता संघटना व संबधित सुरक्षा रक्षक यांनी मागील चार वर्षापासून वेळोवेळी पत्रव्यवहार, निवेदन देणे, आंदोलन करणे यासारखे उपाय केले आहेत. परंतु, मंडळाने केवळ आश्वासन देवून सुरक्षा रक्षकांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा यासाठी २८ डिसेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चार दिवसानंतर आमरण उपोषण जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. जवळपास एका महिना महिन्याचा कालावधीनंतर देखील संघटनेच्या मागण्यांची पूर्तता करण्यात न आल्याने त्यांनी आज पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केले आहे. या उपोषणात संघटनेचे अध्यक्ष कॉ. राजेश गायकवाड, सचिव बापूसाहेब जावळे, संघटक एकनाथ झाडे, मनोज धिवरे, विश्वास वानखेडे, अनिल तायडे, मोतीलाल ढाके, सचिन नन्नावरे, वासुदेव बडगुजर, दिनेश खंबायत, राजेंद्र साळुंखे, गोरख पाटील आदी सहभागी झाले आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/129043995759163