जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हात तलावात मासेमारीसाठी शासनाने ठेका न देता स्थानिक आदिवासी बांधवांना नाममात्र फी आकारून मासेमारीची परवानगी देण्यात यावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आदिवासी एकता परिषदेतर्फे राज्य संयोजक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, बोदवड तालुक्यातील मौजे वराड बु।। येथील जलचक्र तलाव अनेक वर्षांपासून आदिवासी भिल्ल समाजाच्या ताब्यात होता. त्याचा शासनामार्फत लिलाव पध्दतीने ठेका न देता तेथील स्थानिक मासेमारी करणारे आदिवासी बांधवांना नाममात्र फी आकारून मासेमारी करण्यास परवानगी देण्यात यावी. जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न.हद्दीतील नेवरे तलाव व शेगजन बाबा तलाव तसेच चमारदडीतील पाझर तलाव, कारखान्या जवळील तलाव हे 35 हेक्टर आतील तलाव लिलाव पध्दतीने ठेका न देता स्थानिक आदिवासी भिल्ल समाजाला नाममात्र फी आकारून मासेमारी करण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच मौजे शिरसोली प्र.न. येथील रहिवासी दिलीप हरचंद सोनवणे यांच्या मालकीचे प्लॉट नगर भूमापन क्रमांक 487 या मिळकतीवरील सत्ता प्रकार ‘ग’ ऐवजी ‘ब’ सत्ता प्रकारावर अर्जदार यांचे शर्तभंग नियमाकुल करून देण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहे. तो तात्काळ आदेश करून देण्याचे प्रस्ताव प्रलंबीत आहेत तो तात्काळ मंजूर करून न्याय देण्यात यावे.या आंदोलनात सुनील गायकवाड यांच्यासह रतन शहादू सोनवणे, दिलीप हरचंद सोनवणे, रामा सुकलाल भिल, राजू गायकवाड, सुभाष मोरे आदी सहभागी झालेले आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/424552426245013