जामनेर प्रतिनिधी । सरकारने सीएए, एनआरसी आणि एनपीआर यासारखे संविधान विरोधी कायदे व धोरणांची घोषणा केली आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्री पुराव्याची मागणी सरकार करत आहे. या कायदा व धोरणास जामनेर येथील भारीपतर्फे जाहीर विरोध असून महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र राज्य सरकारविरुद्ध पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा जामनेरात फज्जा उडाला आहे.
देशातील हिंदू, मुस्लिम, आदिवासी, दलित, भटके विमुक्त, पोटासाठी भटकणारे स्थलांतरित अशा ४० टक्के नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत.त्याच्यांकडून भारतीय संविधानाने दिलेले नागरिकत्व काढून घेण्याचे षडयंत्र या सरकारकडून रचले जात आहे. या अशा देशासाठी घातक ठरू पाहणाऱ्या निर्णयांचा विरोध करण्यासाठी भारिपच्या वतीने आज २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्याचा जामनेरात मात्र काही परिणाम दिसून आला नाही. तर दुसरीकडे भारिपचे तालूकाध्यक्ष सचिन सुरवाडे यांनी आपल्या समर्थकांसह शांततेत शहरात फिरून अहिंसक पद्धतीने जामनेरकरांना बंदचे आवाहन केले. तहसीलदार शेवाळे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर जोहरे, किशोर तायडे, सुरेश सुरवाडे, सौरव अवचारे, संतोष मोरे, किरण सुरवाडे, धम्मपाल इंगळे, भुषण बाविस्कर, धनराज ब्राह्मणे, देवानंद जोहरे आदी उपस्थित होते.