जामनेर, प्रतिनिधी| राज्याचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी अखंड भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६ व्या जयंतीनिमित आ.गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, जे .के. चव्हाण, श्रीराम महाजन, छगन झाल्टे, नगरसेवक अतिश झाल्टे, सुहास पाटील, उल्हास पाटील, स्वीय सहाय्यक दीपक तायडे, सुभाष पवार, गोलू झाल्टे, कैलास पालवे व पदाधिकारी उपस्थित होते.