जामनेर येथील तृतीयपंथीची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर प्रतिनिधी । येथील स्मशानभूमीत राहणाऱ्या 18 वर्षीय तृतीयपंथाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, आनंदाउर्फ पायल सिद्धार्थ सुरडकर (वय 18) रा. टाकरखेडा ता. जामनेर, ह.मु.  स्मशानभूमीच्या पाठीमागे जामनेर, हा घरात एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. आनंदा हा तृतीयपंथी असून घटनास्थळी जामनेर पोलिस दाखल झाले आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह जामनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आला आहे.

Protected Content