शेंदुर्णी प्रतिनिधी । जामनेर व पाचोरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना त्यांचा मोबदला मिळावा अशी मागणी केली होती त्याची दखल घेतल्याबाबत महाविकास आघाडीचे आभार शेतकऱ्यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील धरणग्रस्तांच्या शेत जमिनीचा गेल्या १५ वर्षापासून प्रलंबित असलेला मोबदला येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांना मिळणार, जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नुकतेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना प्रलंबित मोबदला मिळावा म्हणून मागणी करण्यात आली होती. त्या निवेदनाची दखल घेउन हा मोबदला दिला जात असल्याने महाविकास आघाडी सरकारचे जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, शांताराम गुजर, युवक कार्याध्यक्ष सागर कुमावत व प्रकल्पग्रस्त शेतकरी सुधाकर बारी, प्रभाकर पाटील, अमरीश गरुड यांच्यातर्फे आभार मानण्यात आले आहे. विशेष म्हणजे तालुक्याचे आमदार व माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे संबंधित जलसंपदा सारख्या महत्वाचे खात्याचे मंत्री असूनही तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांना न्याय देण्यात ते अपयशी ठरले होते त्यांच्या काळात ठराविक लोकांना पेमेंट अदा करण्यात आल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला होता.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००