जामनेर प्रतिनिधी। जामनेर तालुक्यात मंगळवार ता.१७ रोजी काही भागात दमदार पाऊस तर काही भागात तुरळक गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा व मक्याचे मोठ्याप्रमाणवर नुकसान झाले. विशेषत: चिंचखेडा परिसरात सर्वाधीक नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी होत आहे.
जामनेर तालुक्यातील तळेगाव, सावरला, आमखेडा, फत्तेपुर, कासली, वाकडी, चिंचखेडा परिसरात सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान दमदार पाऊस झाला. तर काही भागात गारपीट व वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला गहू, हरभऱ्यासह मका भुईसपाट झाला. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. ऐन गहू हरभरा काढणी वर आला असताना हा वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर मका पिकाचे देखील मोठ्या प्रमाण नुकसान झाले अाहे. काही शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली आहे. तयार झालेल्या फळांमध्ये अळी पडण्याचा धोका निर्माझा झाला असून भाजीपाला्याचेही नुकसान होणार आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीपाचे पिक हातचे गेले होते. रब्बीच्या पिकांची आशा होती, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. थोडेफार प्रमाणात कापूस पिकाचे उत्पादन झाले, तर अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रास्त आहेत. निसगार्तील बदल, व अल्प भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडला अाहे.