जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथून एका १५ वर्षी अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पडविण्याची घटना घडली आहे या संदर्भात शुक्रवारी १९ मे रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील या गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ मे रोजी रात्री १० ते १५ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी ही घरात झोपलेली असताना तिला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी विशाल राजू गोमलाडू रा. गोंदले ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अखेर शुक्रवारी १९ मे रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साहिल तडवी करत आहे.