जामनेर तालुक्यातील महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा जुन्या भांडणाच्या कारणावरून वादातून महिलेच्या पतीला मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ३० वषीय महिला ही जामनेर तालुक्यातील एका गावात आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील सुनील आत्माराम ठाकरे, अशोक धोंडू धनगर, दीपक भानुदास धनगर यांनी २३ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास महिलेचा हात पकडून अंगावरील कपडे फाडले. तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. शिवाय तिचे पती यांना लाथाबक्क्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सुनिल आत्माराम ठाकरे, अशोक धोंडू धनगर, आणि दीपक भानुदास धनगर या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.

Protected Content