जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता महिला ही घरी असतांना गावात राहणारे प्रकाश दशरथ भील, लिलबाई दशरथ भील, भारत दशरथ भील रा. सावरला ता.जामनेर जि.जळगाव यांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तर एकाने महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. याप्रकरणी मंगळवारी २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रियाज शेख करीत आहे.