Home क्राईम जामनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले

जामनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले

0
174


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळूवन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १६ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अनिल वसंत भिल या तरूणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर जामनेर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडीलांनी धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अनिल वसंत भील याच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिलीप राठोड करीत आहे.04:16 PM


Protected Content

Play sound