जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती 98 टक्के मतदान

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून एकूण २ हजार ७९७ मतदानापैकी २ हजार ६८८ मतदारांनी मतदान केले आहे. एकुण मतदार ९८ टक्के झाले आहे.

जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मध्ये 17 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात असून ही निवडणूक भारतीय जनता पार्टी प्रणित सहकार पॅनल विरुद्ध महाविकास आघाडी प्रणित शेतकरी पॅनलच्या मध्ये होत असून भाजपचे वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तर महाविकास आघाडीच्या वतीने संजय गरुड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी आज मतदान झाले ग्रामपंचायत मतदार संघांमध्ये 1027 मतदार होते. त्यापैकी 999 मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावले असून 97 टक्के मतदान झाले आहे. सोसायटी मतदार संघांमध्ये 1177 एकूण मतदान होते त्यापैकी 1149 मतदारांनी आपल्या मतदान बजावले असून 98 टक्के मतदान झाले आहे. व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण 593 मतदान होते. त्यापैकी 540 मतदारांनी मतदान केले असून 91 टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया पार पडली असून आज 29 एप्रिल रोजी जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी हॉलमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश बार यांनी दिली आहे.

Protected Content