जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरांमध्ये सोमवारी शिवसेना ठाकरे गट यांच्यातर्फे कापसाची अंत्ययात्रा काढण्यात आली. मात्र या अंत्ययात्रेमध्ये एकही शेतकरी उपस्थित झाला नाही तर दुसरीकडे बोटावर मोजणे इतकेच शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते या कापसाच्या अंत्ययात्रेत पाहायला मिळाले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलना चा फीआस्को झालेला पाहायला मिळाला आहे.
कापसाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गटातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले होते. मात्र या आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी झाला नाही. पुढारी हे स्वतःची स्टंटबाजी व करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलन करण्याचा प्रयत्न करीत असून आजच्या शिवसेना गटाच्या शेतकरी कापूस आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना राजकीय पुढार्याशी काही देणं घेणं नसल्याचे या आंदोलनातून पाहायला मिळालेला आहे.