जामनेर प्रतिनिधी । पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलीसांनी शस्त्रांविषयी मार्गदर्शन करून सखोल माहिती दिली.
जामनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाबद्दलची माहिती तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे शस्त्र याबद्दलची माहिती जामनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्ष दिलीप राठोड यांनी दिली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रसंपत्ती संरक्षणासाठी पोलीस कशा पद्धतीने कामकाज करतात. ही माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामुळे आठवीचे विद्यार्थी आणि शिक्षकांना या सुवर्णसंधीचा लाभ मिळाला. तसेच वरील संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय प्राचार्या सोनवणे मॅडम यांनी व संस्थेचे सचिव मनोज कावडीया आणि पोलीस वृंदांचे आभार मानले.