पाचोरा, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील जामदार येथील दलीत समाजावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाचोऱ्यात संविधान आर्मी महिला आघाडीच्या वतीने इन्साफ निषेध सभा घेण्यात आली.
याप्रसंगी यावेळी संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे, महिला आघाडी राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष पुष्पा जगन सोनवणे, छोटु सोनवणे यांचे सह उपस्थित मान्यवऱ्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले.
तदनंतर मिलिंद नगर येथे संविधान आर्मीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. मिलींद नगर भागातील बुद्धविहार येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीला जगनभाई सोनवणे यांनी उपस्थितां समवेत संविधान प्रस्तावनेचे वाचन केले. तदनंतर जगनभाई सोनवणे यांनी चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे बौद्ध समाजाच्या नागरिकांवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र भाषेत निषेध करत या घटनेतील सामुहिक गावगुंड समाज कंटक यांना पाच जिल्हे हद्दपार करुन त्यांच्यावर झोपडपट्टी कायदा लावण्यात यावा अशी तीव्र शब्दात मागणी केली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक संविधान रक्षक सैनिक जगनभाई सोनवणे, तसेच खान्देश ची मुलुख मैदानी तोफ, संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष राकेश बग्गन, छोटु सोनवणे, आयोजक संविधान आर्मी पाचोरा तालुका अध्यक्ष हिरालाल सोनवणे, महिला आघाडी राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष पुष्पा जगन सोनवणे (जळगांव), जिल्हा अध्यक्ष संगीता मोरे, पाचोरा शहर अध्यक्ष छाया वाघ, पाचोरा शहर उपाअध्यक्षा वंदना सोनवणे, पाचोरा शहर सरचिटणीस सावित्री पवार, पाचोरा शहर सचिव इंदूबाई सोनवणे, पाचोरा शहर सहसचिव सुनंदा पवार, व सरिता चांगरे व भीमनगर येथील पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. आयोजित सभेनंतर उपस्थित मान्यवरांनी चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे जावुन तेथील कुटुंबीयांची भेट घेतली.