मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आणि शिवसेनेचील जागा वाटपाबाबबत केलेल्या विधानावरून घुमजाव केले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका मेळाव्यात बोलतांना आगामी काळातील जागा वाटपाबाबत केलेले भाष्य चर्चेचा विषय बनले होते. यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष २४० जागांची तयार करत असल्याचा दावा केला होता. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ ४८ जागा मिळणार का ? याबाबत चर्चेला उधाण आले होते.
या पार्श्वभूमिवर, बावनकुळे यांनी समाजमाध्यात शेअर केलेला हा व्हिडीओ डिलीट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी ते वक्तव्य केले असल्याची सारवासारव बावनकुळे यांनी केली आहे.