जळगाव – मध्य रेलवे भुसावळ मंडल तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कृष्णचंद्र सभागृहा मधे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
भुसावळ येथील मध्य रेलवे महिला कल्याण समितिच्या रेशमा मीणा यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, सुमित्रा गांगुर्डे इतर विभागांचे अधिकारी व महिला कल्याण समितिच्या सदस्या आदी उपस्थित होते. यावेळी सुई धागा, लिंबू चमचा, नृत्य, गीत गायन, समुह नृत्य, फैंसी ड्रेस अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
डॉ. रश्मी जोशी यांनी निरामय आरोग्य, मेडिटेशन विषयी डाँ.चारुलता पाटील आणि सहकार्यांनी तसेच कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शुंभांगी राठी आदींनी मार्गदर्शन केले.
गोपाल जोनवाल यांनी सपत्निक आत्म सरंक्षणाचे प्रात्याक्षिक केले. तसेच रुकमैया मीणा, अपर मंडल रेल्वे प्रबंधक व वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी भुसावळ डिविजन मधुन 38 महिलांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तिपत्र, सन्मान चिन्ह तसेच विजेत्या स्पर्धक महिलांना रुकमैया मीणा, रेशमा मीणा यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन देऊन सन्मानित करण्यात आले. आभार प्रसिद्धी सहायक कार्मिक अधिकारी वी. एस.रामटेके यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.