बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून क्षेत्रीय किसान गोष्टी शेतकरी प्रशिक्षण रब्बी हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम मनुर खुर्द तालुका बोदवड येथे संपन्न झाला.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सी. जे. पाडवी यांनी केले. तसेच आत्मा योजनेची माहिती दिली. ममुराबाद कृषी विज्ञान केंद्र विषय विशेषज्ञ किरण माडवडे यांनी आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय शेळीपालन चारा उत्पादन तंत्रज्ञान जनावर रोग विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कडधान्य उत्पादनावर हरभरा पिकावरील मार्गदर्शन किडी रोगावरचा मार्गदर्शन व्ही. एच. भोसले यांनी केले यांनी बाबत माहिती दिली. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न अन्नप्रक्रिया अन्नप्रक्रिया उद्योग बाबत पंकज माळी यांनी शेतकऱ्यांना माहिती देऊन अर्ज भरून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. पी. महाजन यांनी केले. आभार एस. एन. मोरे यांनी मानले.