जागतिक बेघर दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

जळगाव, प्रतिनिधी । जागतिक बेघर दिन म्हणून १० ऑक्टोबर साजरा केला जातो. या वर्षी महापालिका व केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित शहरी बेघर निवारा गृह येथे बेघर व्यक्तींकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मनपा व केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने नेत्र तपासणी, माधवराव गोळवलकर रक्तपेढी च्या सहकार्याने रक्त गट तपासणी व रक्त गट कार्ड वितरण तसेच समुपदेशन करिता बार्टी या संस्थेचे अधिकारी भाग्यश्री पैकराव व सहकाऱ्यांनी कोरोना महामारीच्या या काळात आपले मानसिक संतुलन व स्वास्थ्य कसे योग्य राखावे या विषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, महापालिकेच्या व्यवस्थापिका गायत्री पाटील यांनी शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी बेघर निवारा गृहचे प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा, दुर्गेश वाणी, मनिषा पारधी, राजेंद्र मराठे, प्रदिप पाटील, किरण मोरे व सुनिल भामरे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content