Home Cities जळगाव जळगाव भाजपातर्फे बहिणाबाई कोवीड सेंटरमध्‍ये फळ वाटप

जळगाव भाजपातर्फे बहिणाबाई कोवीड सेंटरमध्‍ये फळ वाटप

0
30

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सेवा सप्ताह आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आज शासकीय तंत्रनिकेत येथील बहिणाबाई कोवीड केअर सेंटरमध्ये बाधित रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

भाजपा मंडल क्रमांक नऊ चे अध्यक्ष निलेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, भाजपा महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महानगराचे महानगर चिटणीस, राहुल वाघ, अमित भाटिया, मंडळ सरचिटणीस, अनंत देसाई, संजय तिर्मले, मंडळ उपाध्यक्ष नानाभाऊ सपकाळे, सुरसिंग पाटील, भूपेश कुळकर्णी, मंडल युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत भंगाळे, नितिन तायडे, दीपक परदेशी उपस्थित होते.


Protected Content

Play sound