जळगाव प्रतिनिधी । शहरातील बिग बाजार परीसरात पार्किगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, विजय पवन सोलंकी (वय-३८) रा. इंद्रप्रस्थ नगर हे बिग बाजारमधील पीव्हीआर येथे कामाला आहे. १७ मार्च रोजी त्यांनी सकाळी १० वाजता बिग बाजाराच्या पार्किग झोनला लावली होती. सायंकाळी ८ वाजता घरी जाण्यासाठी दुचाकीकडे गेले असता दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी सर्वत्र दुचाकीची शोधाशोध सुरू केली मात्र मिळून आली नाही. आज शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.