जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पीपल्स बँकेच्या शेजारी पार्किंगला लावलेली तरूणाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत बुधवारी ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहितीप्रमाणे, पंकज ओंकार बारी (वय-४०) रा. दत्तात्रय नगर, कानडदा रोड जळगाव हा तरुण खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. नोकरीवर जाण्या येण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीआर ११२३) क्रमांकाची दुचाकी आहे. ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता दुचाकीने पंकज हा कामावर आला होता. जळगाव शहरातील पीपल्स बँकेच्या शेजारी त्याने त्याची दुचाकी पार्किंगला लावली. आज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली, दुपारी ४ वाजता दुचाकी चोरी झाल्याचे पंकज बारी याच्या लक्षात आले. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, दुचाकी कुठेही न मिळून आल्याने अखेर रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहे.