जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तोलकाट्याजवळ भरधाव ट्रक वळण घेत असतांना अचानक पलटी झाल्याची घटना रविवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती. पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव-जामनेर रोडवर असलेल्या जळगाव तोलकाट्याजवळ रविवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक (जीजे १० टीव्ही ७५४५) वरील चालक जेठाभाई पिंगाभाई पिंगल (वय-६५) रा. ढिचडा ता.जि.जामनगर गुजराथ याने हयगयी करून भरधाव वेगाने येवून वळण घेत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पटली झाला. यावेळी काहीवेळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक जेठाभाई पिंगाभाई पिंगल (वय-६५) रा. ढिचडा ता.जि.जामनगर गुजरात याच्या विरोधात सोमवारी ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.