जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या. उद्या शुक्रवारी मतदान होणार असून जळगाव तालुक्यातील ४० गावांमधून १ लाख ८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आज दुपारी नूतन मराठा महाविद्यालयातून निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य वाटप होणार आहे.
नशिराबाद येथे १६ जागा रिक्त असून एक जागा बिनविरोध झाली आहे. मोहाडी व डिकसाई येथेही बिनविरोध निवड झाल्याने तिन्ही ठिकाणी मतदान हाेणार नाही. तालुक्यात ५९ उमेदवार बिनविरोध निवडून अाले अाहेत. आसोदा, कानळदा, ममुराबाद, म्हसावद, शिरसोली प्र.बो., शिरसोली प्र.न. या मोठ्या गावांमध्ये उत्कंठावर्धक लढती हाेत अाहेत. प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावल्या आहेत. गुरुवारी संक्रातीचे औचित्य साधून तिळगूळ देवून तिळाच्या गोडव्यातून मतांचा जोगवा उमेदवार मागतील. तालुक्यात अातापर्यंत अाचारसंहिता भंगचा एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे आचारसंहिता कक्षप्रमुख शशिकांत सोनवणे यांनी दिली. जळगाव तालुक्यातील एकुण १७० मतदार केंद्र आहेत. ४० ग्रामपंचायतीच्या ४०४ जागांसाठी ९६५ उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहेत –
फुपणी, देवगाव, धानोरा बुद्रूक, वावडदा, दापोरा, कठोरे, आव्हाणे, तरसोद, पिलखेडे, गाढोदे, फुपनगरी, वडली, वडनगरी, आवार, तुरखेडा, कडगाव, जवखेडे, कडगाव, शेळगाव कानसवाडे, रामदेववाडी, वावडदा, लमंाजन, रायपूर, कंडारी, रिधुर, नांद्रे खुर्द, मन्यारखेडा येथे प्रत्येकी तीन मतदान केंद्र आहेत. नांद्रा बुद्रूक, कानळदा, उमाळे, चिंचोली, धानवड, भोकर, बोरनार, सावखेडा बुद्रूक, वाकडी लमांजन या गावात चार तर आव्हाण्यात पाच, कानळदा व जळगाव खुर्द सहा, भादली बुद्रूक सात, ममुराबाद आठ, म्हसावद, शिरसोली प्र.न. नऊ, शिरसोली प्र.बो. १०, तर सर्वाधिक मतदान केंद्र आसोदा येथे १२ आहेत. मोहाडी, डिकसाई येथे निवडणूक बिनविरोध झाली अाहे.