जळगाव, प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काल भंडारा जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींविरोधात बेताल वक्तव्य केले असून त्यांच्या विरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जळगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
जळगाव तालुका भाजपने तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “मी मोदीना मारू शकतो व मी मोदीना शिव्या ही देऊ शकतो” असे बेताल वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमानच केलेला नाही तर एक प्रकारे पंतप्रधान यांना धमकी देणारे वक्तव्य केले. यावरून कांग्रेसची मोदीजी बद्दलची शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते. या वक्तव्यच्या निषेधार्थ जळगाव तालुका भाजपाच्यावतीने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरुद्ध त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, सरचिटणीस अरुण सपकाळे, चिटणीस मिलिंद चौधरी, गिरीश वराडे, चेतन पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस ललित बऱ्हाटे, उपाध्यक्ष दिपक पाटील आदी उपस्थित होते.