जळगाव जिल्ह्यात 5 फेब्रुवारीपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत.

मनाई आदेश 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, 2020 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content