जळगाव जिल्ह्यात यादव, खालिद यांच्या शनिवारी तीन जाहीर सभा

 

जळगाव, प्रतिनिधी | येथील ‘संविधान बचाव नागरी कृती समिती’तर्फे शनिवारी (दि.८) सी.ए.ए., एन.आर.सी. व एन.आर.आय.सी. या कायद्यांच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या ‘हम भारत के लोग’ या समन्वय व्यासपीठ समितीचे सदस्य योगेंद्र यादव व युवा नेते उमर खालिद यांच्या जाहीर सभांचे आयोजन केले आहे.

 

हे दोन्ही नेते त्यानिमित्त जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी ९.०० वाजता अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात ‘लोकशाही न्याय व समता खरी भारताची गरज’ या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भुसावळ येथे दुपारी ३.०० वाजता ‘संविधान व भारतीय लोकशाही’ या विषयावर आणि जळगाव येथे अजिंठा चौफुलीवरील हॉटेल महिंद्राशेजारी सायंकाळी ७.०० वाजता ‘सी.ए.ए., एन.आर.सी. व एन.आर.आय.सी. यामुळे भारतीय लोकशाहीवर होणारे परिणाम’ या विषयांवर या नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या तिन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content