पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलीस पाल्य आरक्षणाच्या मुद्द्यावर जळगाव जिल्ह्यातील हर्षल हिरालाल पाटील व नदीम शकील शेख यांनी पोलीस बॉईजने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई भेट घेतली.
राज्यातील सेवेत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा दिलेल्या पोलीस पाल्य आरक्षणात समावेश करण्यात यावा. या मागणीविषयी सदर भेट झाली. याप्रसंगी ‘पोलीस पाल्य आरक्षणावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीअंती दिले आहे.
मागील काही काळापासून अनेक वेळा पोलीस पाल्य आरक्षणाचा पाठपुरावा केला जात असून आता हे सरकार पोलीस पाल्यांना नक्कीच न्याय देणार अशी आशा महाराष्ट्रातील सर्व पोलीस पाल्यांना आहे.