जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोवीडसाठी अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा अशी मागणी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच शाळा सुरू होणार असल्यामुळे कोविडसाठी अधिग्रहीत केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे, तसेच, भडगाव तालुक्यातील तहसिलदारांनी सूचनांचे दूर्लक्ष करून महिला शिक्षकांच्या कोविड कामासंबधी आदेश काढले असल्याचा आरोपही संघातर्फे करण्यात आला आहे़ त्यामुळे संबंधित आदेश रद्द करण्यात यावा,अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ निवेदन जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर महिला जिल्हाध्यक्ष ज्योती राणे व जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.