जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा न्यायालयात रविवारी ३० एप्रिल रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालितीमध्ये एकूण ६ हजार ४९७ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १९ कोटी ७१ लाख ४२ हजार ३८८ रूपयांची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक अविनाश कुलकर्णी यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक कामगार आणि जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा सेवा विधी प्राधिकारणाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश पॅनल, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि दोन्ही बाजूचे पक्षकार यांच्या मदतीने ५ हजार १०२ दाखलपूर्व प्रकरणे, न्यायालयातील प्रलंबित ९६३ प्रकरणे आणि ऑनलाईन पद्धतीने ७ प्रकरणे देखील निकाली काढण्यात आले आहे. असे एकूण ६ हजार ४९७ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले असून या माध्यमातून तब्बल १९ कोटी ७१ लाख ४२ हजार ३८८ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा विधी सेवाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख एम.क्यू. एस.एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.ए. शेख, जिल्हा सरकारी वकील एस.जी. काबरा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. केतन ढाके, पॅनल न्यायाधीश एस. आर. पवार, जे.जे. मोहिते, न्यायाधीश एस.पी. सय्यद, न्यायमूर्ती व्ही.व्ही. मुगळीकर, न्यायमूर्ती जोशी, न्यायाधीश श्रीमती एम.पी. जसवंत, ॲड. पवन ताडे, ॲड. प्रसन्न फसे, देवेंद्र जाधव, श्याम जाधव हेमंत, गिरणारे वैशाली, जंजाडे प्रबंधक ए.आर. तांबटकर, विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधीक्षक अविनाश कुलकर्णी, प्रमोद पाटील, प्रमोद ठाकरे, गणेश निंबाळकर, प्रकाश काजळे, जावेद पटेल यांच्यासह आदी उपस्थित होते.