जळगाव जिल्हा एनएसयुआय अध्यक्षपदी रावेरचे भूपेंद्र जाधव यांची नियुक्ती

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा एन. एस. यु. आय. च्या अध्यक्षपदी व्ही. एस. नाईक कॉलेज रावेरचे विद्यार्थी नेते भूपेंद्र जाधाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश एन. एस. यु. आय. चे अध्यक्ष अमीर शेख यांनी महाराष्ट्राचे एन. एस. यु. आय. इनचार्ज नागेश करीअप्पा यांच्या संमतीने व अखील भारतीय एन. एस. यु. आय. चे अध्यक्ष निरज कुंदन यांच्या मान्यतेने सदर नियुक्ती केली आहे. तशा आशयाचे मेल भूपेंद्र जाधव यांना प्राप्त झाला आहे. भूपेंद्र जाधव यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांचा पदग्रहण समारंभ दि. १३ मार्च रविवार रोजी दुपारी २ वाजता काँग्रेस भवन जळगाव येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. प्रदिपराव पवार, प्रदेश अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, योगेंद्रसिंग पाटील व प्रदेश सचिव विनोद कोळपकर, जिल्हा युवक अध्यक्ष हितेश पाटील, महिला अध्यक्ष सुलोचना वाघ, सेवादल अध्यक्ष संजय पाटील व सर्व सेलचे प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यांचे अभिनंदन राहुल नानासाहेब पटोले, महाराष्ट्र प्रदेशचे लीगल सेल अध्यक्ष अँड रवि जाधव, अँड गौरव बाफना, धनंजय शिरीष चौधरी, आशुतोष प्रदीपराव पवार यांनी केले आहे.

दरम्यान, मागील नोव्हेंबर महिन्यांमधील युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तत्कालीन एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक लढविल्यामुळे त्यांनी आपल्या एनएसयुआय जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लवकरच त्यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होत असल्यामुळे रिक्त असलेल्या एनएसयूआय जिल्हाअध्यक्ष पदी तत्कालीन जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या संमतीने भूपेंद्र जाधव यांची एनएसयुआय जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. येणाऱ्या तीन महिन्यांनी एनएसयु य जिल्हा अध्यक्ष पदाच्या परत निवडणुका लागतील. तीन महिन्यांसाठी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आमदार शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी स्वागत केले.

Protected Content