जळगाव प्रतिनिधी । शहरात दोन ठिकाणी घरफोडी करून सोने, चांदीच्या दागिन्यांसह तब्बत पाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून मुद्देमालासह रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मोहनसिंग जगदिशसिंग बावरी वय-18 व सोनुसिंग जगदीशसिंग बावरी वय – 22 दोन्ही रा. शिरसोली नाका, तांबापुरा, या दोघा भावंडांची घरफोडी करुन लाखांचा ऐवज लांबविणार्याची नावे आहेत. त्याच्याकडून दोन्ही घटनांमधील काही दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत. शहरात 24 ब श्रीनगर, महाबळ येथे उदय प्रल्हाद थोरात वय – 24 यांचे 6 जून रोजी बंद घराचे दरवाजाचे कडीकोंडा व कुलुप तोडुन आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटात एकूण 3 लाख 58 हजार 650 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागीने घरफोडी करुन चोरुन नेले होते. या घटनेनंतर 15 दिवसांनी आदर्शनगरातील नसिम हमीद तडवी वय -52 यांचे बंद घर लक्ष्य करुन दीड लाखांचे दागिणे चोरुन नेले होते. दोन्ही घटनांप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी घरफोड्या करणार्या संशयितांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश मेंढे, संजय हिवरकर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, सुनिल दामोदरे, गफुर तडवी, महेश महाजन यांचे पथक नियुक्त केले. घरफोड्यांमधील दागिणे शहरातील सराफा व्यावसायिकांकडे मोडण्याकरीत संशयित येणार असल्याची खबर पथकाला होती. त्यानुसार पथक सराफ बाजारात पायी गस्त घालत होते. या गस्तीदरम्यान संशयित मोहनसिंग बावरी व सोनुसिंग बावरी हे दोन्ही असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी त्यांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात आले आहे.