Home क्राईम जळगाव कृउबा समितीतून भाजीपाला विक्रेत्यांचे तीन मोबाईल लांबविले

जळगाव कृउबा समितीतून भाजीपाला विक्रेत्यांचे तीन मोबाईल लांबविले

0
29

जळगाव प्रतिनिधी । जळगाव- औरंगाबाद रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील भाजीपाला मार्केट येथून एका भाजीपाला विक्री त्याचा २६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र विश्वनाथ सोनार (वय-४९) रा. भादली बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव हे भाजीपाला विक्रीचे काम करतात. २५0 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते जळगाव औरंगाबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट येथे भाजी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल तर सोबत असलेले दोन सहकाऱ्यांचा १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असे एकूण २६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी रवींद्र सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक इम्रान सय्यद करीत आहे.

 


Protected Content

Play sound