जळगाव प्रतिनिधी । पंधरा दिवसात पैसे देतो असे सांगून तालुक्यातील धानवड गावातील १८ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जळगावातील तीन व्यापाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक एकनाथ पाटील (वय-४०) रा. शिवाजी चौक धानवड ता.जि.जळगाव हे शेतीचा व्यवसाय करतात. गेल्यावर्षी त्यांनी कापसाची लागवड केली होती. जळगावातील अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (पुर्ण नाव माहिती नाही) तिघे रा. अयोध्या नगर, जळगाव हे तिघे कापूस व्यापारी आहेत. २९ मे २०२० ते ९ जून २०२० दरम्यान वाल्मिक पाटील यांच्यासह गावातील इतर १७ शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून १५ दिवसात पुर्ण पैसे देतो असे सांगून कापूस खरेदी केला. शेतकऱ्यांकडून (एमएच १९ सीवाय ०७१७) क्रमांकाच्या गाडीवर नेऊन अद्यापपर्यंत कापसाची रक्कत दिली नाही. वारंवार तगादा लावूनही एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही.
यांची झाली फसवणूक (कंसात रक्कत)
वाल्मिक एकनाथ पाटील (50 क्विंटल- २ लाख ३५ हजार), पंढरीनाथ बाबुराव पाटील (८४ क्विंटल- ३ लाख ९६ हजार), कैलास आत्माराम पाटील (११० क्विंटल- ५ लाख १७ हजार), बाबुराव तुळशीराम पाटील (६१ क्विंटल- २ लाख ८६ हजार), पंडीत मधुकर पाटील (९७ क्विंटल- २ लाख ५० हजार), रंगानाथ यशवंत पाटील (२१ क्विंटल- ९८ लाख ७००), समाधान भाऊराव पाटील (५२ क्विंटल- २ लाख ४८ हजार), शांताराम एकनाथ पाटील (३७ क्विंटल- १ लाख ४५ हजार), राजेंद्र शिवराम पाटील (५३ क्विंटल- २ लाख ५१ हजार), बापू सदाशिव भावसार (१२.७७ क्विंटल- ६० हजार), प्रभुदास बाबुराव पाटील (८६ क्विंटल- २ लाख), नामदेव गोविंदा पाटील (३९ क्विंटल- १ लाख ), अशोक शेनफडू पाटील (३ लाख २३ हजार), राजाराम लक्ष्मण आवारे (२० क्विंटल- ९६ हजार), अर्जुन लक्ष्मण आवारे (६४ क्विंटल- २ लाख ५४ हजार), सखाराम लक्ष्मण आवारे (३९ हजार), बंडू गोबा पाटील (२१ क्विंटल- १ लाख १हजार), नाना माधव पाटील (६ क्विंटल- २८ हजार), चंद्रकांत नामदेव आवारे (२७ क्विंटल- १ लाख) असे १८ शेतकऱ्यांकडून एकुण ३५ लाख ११ हजार २८९ रूपयांमध्ये फसवणूक केली.
फिर्यादी वाल्मिक पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (पुर्ण नाव माहिती नाही) तिघे रा. अयोध्या नगर, जळगाव यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.