जळगाव प्रतिनिधी । अचानक प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर कुटुंबीयांनी हलविलेल्या एकाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात गुरूवारी रात्री 11.35 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
बाळू नथ्थू शिंपी (50)रा. प्रेमनगर जळगाव असे मयताचे नाव आहे. बाळू शिंपी हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचे. गुरूवारी
रात्री त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी रात्रीच त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. मयताच्या पश्चात दोन मुली, मुलगा अविनाश असा परिवार आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बिराजदार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.