जळगावात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १३ लाखात ऑनलाईन फसवणूक

 

जळगाव प्रतिनिधी । नोकरीत असतांना एलआयसी पॉलीसीच्या माध्यमातून चांगला आर्थिक परतावा मिळणार अशी बतावणी करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला १२ लाख ७० हजार रूपयाला गंडा घालवणाऱ्या संशयित आरोपीला दिल्ली येथून अटक केली. न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी विलास माधवराव पाठक (वय-६२) रा. रा. सिध्दी विनायक कॉलनी अक्षय हॉस्पीटल मागे धुळे रोड ता.अमळनेर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ०७ फेब्रुवारी २०१९ रोजी दिल्ली येथुन उर्वशी शर्मा या महीलेचा फोन आला व सदर महिलेने सांगीतले की, मी एलआयसी ऑफिसमधुन बोलत असुन आपण नोकरीत कार्यरत असतांना एलआयसीमध्ये गुंतवणुक होती. त्या गुंतवणुकीवर आपल्याला १ लाख ६५ हजार ८५० रूपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. व त्या महीलेने फिर्यादीची जन्मतारीख व घरी असलेला लँडलाईन नंबर व एलआयसी पॉलीसी फाईल सांगीतला. त्यावरून फिर्यादीचा विश्वास झाला की, हे एलआयसी मधुनच बोलत आहे. त्यानंतर त्या महीलेने फिर्यादीचे ओळखपत्राचे सर्व कागदपत्रे पोस्टाद्वारे मागवुन घेतले.

फिर्यादीने पाठविलेल्या कागदपत्रांचा उपयोग करुन आरोपींनी फिर्यादीच्या बनावट पॉलीसी तयार करुन सदर पॉलीसी पाठक यांच्या घरी पाठविल्या होत्या. त्यानंतर सदर पॉलीसीमध्ये गुंतवणुक केल्यास आपल्याला चांगला परतावा मिळेल असे सांगुन फिर्यादीकडुन वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी १२ लाख ७० हजार २५५ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात स्विकारुन फसवणुक केली होती. याप्रकरणी सायबार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने, पो.कॉ श्रीकांत चव्हाण, पो.कॉ. नितीन भालेराव, पो.कॉ. गौरव पाटील यांना दिल्ली येथे रवाना केले. २३ फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी अमित सिंग उर्फ अमित देवेंद्र शर्मा रा. घर नं. ७७ बॅक कॉलनी, हर्ष विहार दिल्ली येथन अटक केली. २६ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीची ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातुन गन्ह्यातील पैसे काढण्यासाठी वापरलेले वेगवेगळ्या बँकांचे ६ एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पो.नि.बळीराम हिरे, सपोनि अंगत नेमाणे, पोकॉ श्रीकांत चव्हाण, पो.कॉ. नितीन भालेराव, पो.कॉ. गौरव पाटील करीत आहेत.

Protected Content