जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जळगाव शहरातील सार्वजनीक ठिकाणी थुंकल्यास पाचशे रूपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे निर्देश आयुक्तांनी जारी केले आहेत.
महापालिका आयुक्त सतीश कुळकर्णी यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी आदेश काढले आहेत. त्यानुसार जळगाव शहरात कोठेही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल. तसेच, बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्यांना देखील ग्राहकांना २०० रुपये तर दुकानदारांना २ हजार रुपये दंड आकरण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी तोंडाला मास्क न बांधण्ल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्याचे निर्देश जारी केले होते. हा नियम जळगावात देखील लागू राहणार असून याच्या जोडीला आयुक्तांनी दिलेला आदेशही लागू राहणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००