जळगाव प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लॉकडाऊन सुरू असतांना दुसरीकडे सारी या व्याधीमुळे अनेक रूग्ण दगावत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू असून जिल्ह्यात यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे दिसून आला आहे. तथापि, कोरोनाशी साधर्म्य असणार्या सारी म्हणजेच सिव्हीयर अॅक्युट रेस्पीरेटरी इलनेस या व्याधीचा प्रकोप वाढला आहे. यात श्वसनाचा वेग हा नियमितपेक्षा जवळपास ३० पटीने वाढतो. त्यामुळे ऑक्सीजन घ्यायला त्रास होतो व दम लागतो. अशा परिस्थितीत पेशंटच्या शरीरातले वेगवेगळे अवयव निकामी होतात. व त्यामुळे अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो. अशा प्रकारचे आजार सध्या कोरोना बरोबर सुरू असून या सोबत जर असे रुग्ण डायबिटीस, हायपर टेन्शन, हृदयाचे आजार, इम्युनिटी डाऊन अशा आजारांनी ग्रस्त असतील तर अशा रोगांमध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. साधारण ६० ते ६५ वयोगटातील रुग्णांना याचा प्रादुर्भाव संभवतो. जळगावच्या शासकीय वैद्यकीय रूग्णालयात सारीच्या व्याधीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये १९ रूग्ण दगावले असून या व्याधीवर मात करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००