जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पर्हश्वभूमीवर देशासह राज्यात मागील साडे तीन महिन्यापासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. ते आता पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. यानुसार आजपासून राज्यातील सलून व्यावसायिकांना केवळ केस कर्तनाची परवानगी देऊन दुकानं उघडी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, आज रविवार असून देखील ग्राहकांनी सलूनमध्ये येण्याचे टाळल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले.
शहरातील सलून व्यावसायिकांनी शासनाच्या नियमानुसार दुकानातं सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब केल्याचे दिसून आले. नवीन बसस्थानकाजवळील देशपांडे मार्केटमधील स्वागत हेयर आर्ट या सलून दुकानांत ग्राहकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली होती. यात ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे टेम्परेचर मोजले जात होते. ग्राहकांना सॅनिटायझर देण्यात येत होते. यानंतर त्यांचे नाव,पत्ता, मोबाईल नंबरची नोंद एका रजिस्टरमध्ये घेण्यात येत होती. स्वागत हेयर आर्टचे संचालक आत्माराम महाले यांनी साडेतीन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचें सांगितले. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. शासनाने केवळ केस कर्तनच नव्हे तर पूर्व व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील श्री. महाले यांनी केली. तसेच चोपडा मर्कट मधील मोहन हेअर सलून येथे फेस शिल्ड, कारागीर व ग्राहकांसाठी अॅप्रेन, सॅनिटायझर, उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, एवढी तयारी करून देखील सकाळपासून एकही ग्राहक आला नसल्याची कैफियत मोहन हेअर सलूनचे मुकुंद सोनवणे यांनी मांडली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3074130022701138/