जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी असतांना अनावश्यक रित्या दुकाने फिरणाऱ्या आठ जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत विनाकारण फिरणाऱ्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तिलक बन्नालाल सारसद (वय-२५) रा. गुरुनाथ नगर, शनीपेठ (पायदळ), दिपक संतोष त्रिपाटी (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव (पायदळ), योगेश वसंत वाणी (वय-४८) रा. संत ज्ञानेश्वर चौक, मेहरुण (पायदळ), गोकुळ भास्कर पाटील (वय-२५) रा. लमांजन, पोस्ट म्हसावद ता.जि.जळगाव (पायदळ), राजेंद्र हरीसिंग जाधव (वय-२३) रा. रामेश्वर कॉलनी (महींद्रा जितो वाहन क्र. एमएच ०५ डिके ११७८), काशीनाथ शेरबहादुर चव्हाण (वय-३८) रा. सुप्रीम कॉलनी, (एमएच १९ सीए १२३१), राहुलखुमान पवार (वय-२८) रा. मोहाडौता जि.जळगाव रिक्षा (एमएच १९ बीएच ०६८४), हर्षल अशोक माळीवय (वय-२४) रा.असोदा भादली छोटा हत्ती ( एमएच १९ बीएम ५७१६) यांच्या संचारबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.