जळगाव, प्रतिनिधी । आयोध्येत प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर त्यांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार असून यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज पांझरपोळ संस्थान येथे भव्य संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर त्यांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदतर्फे मकर संक्रांत १५ जानेवारी ते माघ पोर्णिमा दि. २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत देशभरात निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. निधी संकलन अभियानाची सर्व संत, महंतांनी हे धर्म कार्य समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी व समाज जागृत आणि प्रोत्साहीत करण्यासाठी जिल्ह्यात भव्य संत संमेलनाचे आयोजन पांझरपोळ गोशाळा येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी श्री श्री १००८ हभप महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली, हभप योगी दत्तानाथजी महाराज, श्री श्री १००८ हभप भगवान महाराज, देवगोपाल शास्त्री, हभप कृष्णाजी महाराज, योग गुरु जितेंद्र महाराज यांची प्रमुख उपस्थित होती. विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष हरीश मुदडा, जिल्हा अभियान प्रमुख देवेंद्र भावसार, धर्माचार्य हभप संदिप महाराज आदी कामकाज पाहत आहेत.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/3573364516080859
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/147558400313588