जळगाव, प्रतिनिधी । शहरातील तांबापुर अजमेरी गल्लीतील 26 वर्षीय विवाहीतेची छेडखानी करुन धमकावणाऱ्या एकावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तांबापुरा अजमेरी गल्लीतील 26 वर्षीय विवाहीता पायी जात असतांना शेख समीर ऊर्फ खब्बु शेख अब्दुल्ला हा समोरुन आला, व गाणे म्हणतच हातवारे करुन हावभाव करु लागल्याने त्यास हटकले असता, विवाहीतेच्या दिराच्या अंगावर धावुन आला. पिडीतेने दिलेल्या तक्रारी वरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.