जळगाव प्रतिनिधी । शहरातील ॲग्लो उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीचा चक्कर येवून पडल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. शाळेत वर्गात जाण्यासाठी जिना चढतांना विद्यार्थींनीला चक्कर आला होता.
अधिक माहिती अशी की, मिधहत फातेमा नईम शेख (वय-१७) रा. शाहु नगर, जळगाव ही मुलगी शहरातील हॉजी नूर मोहंम्मद चाचा उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिकते. आज सकाळी ८ वाजता तिच्या आईने तिला शाळेत दुचाकीने सोडले, विद्यार्थीनी मिदहद फातेमा ही वर्गात जाण्यासाठी जिना चढतांना अचानक चक्क आल्याने ती खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली. खासगी रूग्णालयात दाखल केले असता तीची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय महाविद्यालयात रवाना केले. वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
दहावर्षांपूर्वी फातेमा यांची मोठी बहिण बिरजीस फातेमा हीचा देखील बिग बाजार येथे जीना चढतांना याच पध्दतीने चक्क येवून पडून मृत्यू झाला होता. दोन्ही बहिणी एका शाळेत शिकल्या तसचे त्यांची आई देखील याच शाळेत शिकलेल्या आहेत. वडील नईम शेख हे रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. मयत मिदहद फातेमा हिच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.