जळगाव प्रतिनिधी । येथील लायन्स क्लब इंटरनेशनल या सेवाभावी संस्थेच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २ च्या प्रादेशिक ८ ची परिषद ‘संकल्प’ चेअरमन रितेश छोरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या परिषदेत जळगाव, भुसावळ, नांदुरा व खामगाव येथील दहा क्लबच्यावतीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मल्टीपल कौंसिल चेअरमन गिरीश मालपानी, संगमनेर तथा प्रांतपाल विवेक अभ्यंकर, औरंगाबाद तसेच प्रेम रायसोनी, एच एन जैन, सुनिल देसर्डा, अनिल पगारिया, सतिश हरगुनानी, अशोक सपकाळ व सपना छोरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेत जळगाव, भुसावळ, नांदुरा व खामगाव येथील दहा क्लबच्यावतीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्यात आला. कोरोना महामारीदरम्यान विविध क्लबच्यावतीने समाजपयोगी सेवाकार्य करण्यात आले. या सेवाकार्यांची दखल घेऊन प्रादेशिक चेअरमन रितेश छोरिया यांनी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार देऊन क्लब सदस्यांना सन्मानित केले. लायन्स क्लब जळगाव गोल्ड सिटी तर्फे सर्वसामान्य लोकांमधे जागरूकता व्हावी म्हणून मधुमेह व बाल कर्करोग या पुस्तिकांचे लोकार्पण या परिषदेत करण्यात आले. या परिषदेचे सयोंजक शिरीष सिसोदिया होते. तसेच सूत्रसंचालन मनोज चांडक व पूजा चांडक यानी केले.