जळगाव प्रतिनिधी । युवाशक्ती फाऊंडेशन व रायसोनी समूहातर्फे आज शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्यासह आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसेवक विष्णू भंगाळे, माजी महापौर ललित कोल्हे, शरद तायडे, रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. प्रीती अगरवाल यांनी या कार्यक्रमात पतंग उडवण्याचा आनंद घेतला.
याप्रसंगी प्रा. मकरंद वाठ, प्रा. राज कांकरिया, प्रा. तन्मय भाले, प्रा. राहुल त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमास संदीप सूर्यवंशी, उमाकांत जाधव, पीयूष हशवाल, समीर कावडिया, आकाश वाणी, तेजस दुसाने, शिवम महाजन, राहुल महाजन, विनोद सैनी, मनजित जांगीड, भवानी अग्रवाल आदींनी सहकार्य केले. डॉ. प्रीती अगरवाल यांनी प्रास्ताविक केले. तर आयोजन समिती पदाधिकारी व सहकार्यांनी परिश्रम घेतले.
पतंगोत्सवात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांच्या आग्रहाखातर पतंग उडवली. मात्र, पतंग उडवायला सुरुवात करताच मैदानावरील एकाने गिरीश महाजनांची पतंग कापल्याने एकच हशा पिकला. दरम्यान, याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ना. गिरीश महाजन म्हणाले की, एकमेकांचा पतंग कापताना दुसर्याचाच मांजा कापला जातो, तेव्हा सावधानतेने पतंग उडवावे, असे आवाहन त्यांनी केले. पतंगोत्सवाच्या ठिकाणी प्रशासनातर्फे ईव्हीएम आणि ई-व्हीपॅट मशीन ठेवली होती. याद्वारे नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही प्रणाली वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली.