Home क्राईम जळगावात महिलेवर अत्याचार; बेपत्ता झालेल्या पतीला शोधण्याच्या बहाण्याने साधली जवळीक

जळगावात महिलेवर अत्याचार; बेपत्ता झालेल्या पतीला शोधण्याच्या बहाण्याने साधली जवळीक


जळगाव प्रतिनिधी । बेपत्ता झालेल्या पतीला शोधण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेसोबत एकाने ओळख करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत महिलेवर अत्याचार केले. यातून ती महिला गर्भवती राहिल्याने त्या इसमाने त्या महिलेचा गर्भपात करुन तीला सोडून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. केल्याप्रकरणी एकावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील २३ वर्षीय महिलेचा पती बेपत्ता झाल्याने ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेली. पोलीस ठाण्याबाहेर त्या महिलेची रविंद्र भगवान भडक याच्यासोबत ओळख झाली. मी तुमचा पती शोधण्यास मदत करेल असे सांगत त्याने महिलसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या महिलेचा पतीला शोधण्यासाठी रविंद्र भडक हा तीला सोबत घेवून त्याला शोधण्यासाठी घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार
रविंद्र भडक याने त्या महिलेला सुरुवातीला सोयगाव येथे नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी तिला लग्नाचे अमिष दाखवून शिर्डी, अजिंठा, फर्दापूर येथे घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच घर मालकाचे भाडे थकीत झाल्याने रविंद्र भडक याने त्या महिलेला त्याच्या ओळखीने खोली घेवून दिली होती. दरम्यान, त्या महिलेच्या पतीचा शोध लागला परंतु त्याला या सर्व प्रकारची माहिती झाल्याने त्याने त्या विवाहितेला नांदविण्यास नकार देत पुन्हा तिला सोडून दिले. यावेळी रविंद्रने त्या विवाहीतेला लग्नाचे वचन देत तिला संसारपयोगी वस्तूंची खरेदी करुन दिली होती.

बेकायदेशीर रित्या केला गर्भपात
वारंवार अत्याचार झाल्यानंतर ती विवाहीता गर्भवती झाली. परंतु रविंद्र भडक याने गर्भपाताच्या गोळ्या आणून देत एका खासगी डॉक्टराकडून त्या विवाहीतेचा गर्भपात केल्याप्रकरणी त्या महिलेने शुक्रवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विवाहीतेच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound