जळगाव प्रतिनिधी । भरधाव कारवरील ताबा सुटल्याने रिक्षाला धडक देवून रोडवरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली. यात इलेक्ट्रिक पोल वाकला. यात कारचालक जखमी झाला असून त्याच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी माहिती अशी की, शहरातील जिल्हा कोवीड रूग्णालयासमोरील डिव्हायडर जवळ शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास काळ्या रंगाची भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही १०) धडक दिली. यात डिव्हायडरमध्ये असलेल्या खंबा वाकला गेला तर कारचालक मुफ्फदल अली हुसेन अमरेलीवाला हा गंभीर जखमी झाला. अपघात होण्यापुर्वी याच कारने रिक्षाक्रमांक (एमएच १९ जे ६२९१) ला जोरदार धडक दिली. नवी कोरी गाडी असल्याने कारचा अपघात होता कारच्या एअरबॅगमुळे चालक थोडक्यात बचवला. मात्र पायाला गंभीर दुखापत झाली असून खासगी रूग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एमएसईबीतील सहाय्यक अभियंता उमेश घुगे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात कारचालक मुफ्फदल हुसेन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.